विशेषण

विशेषण

नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात.

विशेषणाचे मुख्य ३ प्रकार पडतात

१)  गुण विशेषण

२) संख्या विशेषण

३) सर्वनामिक विशेषण

 

गुण विशेषण

ज्या विशेषणाने नामाचा गुण दर्शवला जातो त्यास गुण विशेषण म्हणतात

उदा-  राम सुंदर मुलगा आहे (सुंदर, कडू, गोड, धृत, शूर ,खारट ,आंबट)

 

संख्या विशेषण

ज्या विशेषणाने नामाची संख्या सुचविली जाते त्यास संख्या विशेषण म्हणतात.

संख्या विशेषनाचे ५ प्रकार पडतात

 

१) गणना वाचक संख्या विशेषण

गणना वाचक संख्या विशेषांचे ३ प्रकार पडतात

अ) पूर्णांक वाचक

उदा- मला दोन भाऊ आहे  (एक, दोन, तीन, चार, पाच)

 

ब) अपूर्णांक वाचक

उदा – मला चतकोर पोळी हवी (अर्धा, पाव, चतकोर, पाऊण)

 

क) साकल्य वाचक (सर्वच्या सर्व)

उदा – आम्ही तिन्ही भावंडे अकोल्यात शिकलो (दोघे, उभयता, चारही, पाचही, तिन्ही)

 

२) क्रम वाचक संख्या विशेषण

उदा – माझा दुसरा भाऊ सरकारी नोकरीवर आहे. (पहिला, पाचवा, पन्नासावा, दहावा, बारावा इत्यादी)

 

३) आवृत्ती वाचक संख्या विशेषण

उदा – हा चौपदरी रस्ता आहे (द्विगुणित, चौपट, तिहेरी)

 

४) पृथक्त्व वाचक संख्या विशेषण

उदा – रावणाला दहा-दहा तोंड होते. (एक-एक, दोन-दोन, पाच-पाच, दहा-दहा)

 

५) अनिश्चित संख्या विशेषण

उदा – माझी सर्व पुस्तक पाण्यात भिजली. (सर्व, काही, इतर)

 

सर्वनामिक विशेषण

उदा – माझे, हे, कोणती, असले, कसली इत्यादी

 

इतर शब्दाचा विशेषणाप्रमाणे वापर

नामसाधित विशेषण

नामा बद्दल माहिती सांगण्यासाठी जेव्हा दुसऱ्या नामाचा वापर केला जातो. तेव्हा त्यास नामसाधित विशेषण म्हणतात.

उदा –

  • माझ्या भावाचे कापड दुकान आहे.
  • त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे.
  • मला सातारी पेढे आवडतात.