वाक्य पृथक्करण

वाक्य पृथक्करण

पृथक या शब्दाचा अर्थ वेगळे असा होतो, पृथक्करण म्हणजे वाक्यातील घटक वेगळे करून त्यांचा एकमेकांशी संबंध दर्शविणे होय.

वाक्याचे दोन विभाग पडतात:-

उद्देश विभाग

१) उद्देश (कर्ता)

२) उद्देश विस्तार

विधेय विभाग

१) कर्म व कर्म विस्तार

२) विधानपूरक 

३) विधेय विस्तार

४) विधेय (क्रियापद)

 

उद्देश विभाग

१) उद्देश (कर्ता)

वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते त्यास कर्ता म्हणतात.

(क्रियापदातील धातूला णारा, णारी, णारे प्रत्यय जोडून कोण ने प्रश्न विचारल्यास उत्त्तर कर्ता येते)

१) रामूचा शर्ट फाटला (फाटणारे काय/कोण)

२) काकांना बाळ झाले. (होणारे काय)

३) श्रावणीला थंडी वाजते. (वाजणारे काय)

४) रामरावांचा कुत्रा मेला. (मारणारे काय)

 

२) उद्देश विस्तार

कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्या पूर्वी असेल तर ते उद्देश विस्तार असते.

१) शेजारचा धोंडू धपकन पडला

२) नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी पास होतात .

 

विधेय विभाग

१) कर्म 

ज्याच्या वर क्रिया घडते ते कर्म असते  कर्मा पूर्वी कर्माबद्दल माहिती सांगणारे शब्द म्हणजे कर्मविस्तार.

१) रामाने झाडाचा पेरू तोडला (झाड तोडला कि पेरू?)

२) गवळ्याने म्हशींची धार काढली. (म्हीस काढली कि धार?)

 

२) कर्म विस्तार

कर्मा पूर्वी कर्माबद्दल माहिती सांगणारे शब्द म्हणजे कर्मविस्तार.

१) रामूने झाडाचा पेरू तोडला.

२) गवळ्याने काळ्या म्हशीची धार काढली .

 

विधान पूरक

कर्त्या बद्दल माहिती सांगणार शब्द जर कर्त्या नंतर असेल तर ते विधान पूरक असते.

१)  राम राजा झाला.

२) कमला डॉक्टर आहे.

३) शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसते.

 

विधेय (क्रियापद)

१) शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसते.

२) ती सुंदर दिसते.

 

विधेय विस्तार

क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे विधेय विस्तार. (क्रियाविशेषण)

१) काल सकाळी, शेजारच्या बागेतील हौदात काळुराम धपकन पडला (पडण्या बद्दल विशेष माहिती)

केव्हा पडला – काळ सकाळी

कोठे पडला – शेजारच्या बागेतील हौदात

कसा पडला – धपकन