उभयान्वयी अव्यय
दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना अभयान्वयी अव्यय म्हणतात.
उभयान्वयी अव्याच्या खालील दोन प्रकार पडतात.
१) प्रधानत्वसूचक(सैयुक्त वाक्य)
- समुच्चयबोधक
- विकल्पबोधक
- न्यूनत्वबोधक
- परिणामबोधक
२) गौणत्वसूचक (मिश्रवाक्य)
- उद्धेशबोधक
- संकेतबोधक
- स्वरूपबोधक
- कारणबोधक
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यव
अर्थाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र वाक्य प्रधानवाक्य जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. जोडली गेलेली वाक्य संयुक्त वाक्य होतात. याचे खालील चार प्रकार पडतात.
समुच्चबोधक
या उभयान्वयी अव्यवयाने पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम केले जाते.
उदा: व, अन, आणखी, न, नि, शिवाय, आणिक इ.
१) वारा सुटला आणि पावसाला सुरवात झाली.
२) रामूने काठी घेतली व कुत्र्याला मारलें.
३) मी गुरुजींच्या पाय पडलो, शिवाय गुरुदक्षिणा दिली .
४) मी आज पुऱ्या अन भाजी आणलीत
विकल्पबोधक
या उभयान्वयी अव्ययातून पर्याय निवड किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकीला पसंती दर्शवली जाते.
उदा: वा, अथवा, अगर, कि, किंवा इ.
१) तुला चहा हवा कि कॉफी ?
२) देह जावो अथवा राहो.
३) मी किंवा माझे वडील या कागदावर सही करतील.
न्यूनत्वबोधक
न्यूनत्व या शब्दाचा अर्थ कमीपणा असा असल्यामुळे पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे दुसरे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडल्या जाते.
उदा: परंतु, पण, बाकी, किंतु, परी इ.
१) त्याने अभ्यास केला; परंतु नापास झाला
२) तिने स्वयंपाक करून ठेवला; पण पाहूणे आलेच नाहीत.
३) मारावे; परी किर्तीरुपी उरावे
परिणामबोधक
पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो.
उदा: म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तेव्हा, तस्मात, कि इ.
१) तो आजारी होत; म्हणून शाळेत आला नाही.
२) तिने मनापासून अभ्यास केला नाही; सबब तिला पहिला वर्ग मिळाला नाही.
गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय
या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य हि मिश्र वाक्य असतात. यातील गौण वाक्य किंवा मुख्य वाक्य (प्रधान वाक्य) ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जातो. (प्रधान वाक्य + गौण वाक्य = मिश्र वाक्य)
स्वरूपबोधक
या उभयान्वयी अव्ययाने मागील शब्दाचा खुलासा किंवा एखादा वाक्याचे स्वरूप किंवा एखाद्या वैक्तीचे म्हणणे गौण वाक्यात दिलेले असते.
उदा: म्हणून, म्हणजे, कि, जे, इ.
१) संभाजी म्हणून शिवाजीस एक पुत्र होता.
२) गुरुजी म्हणाले, कि पृथ्वी गोल आहे.
३) एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर.
उधेशबोधक
प्रधान वाक्याच्या कृतीचा हेतू किंवा उद्देश गौण वाक्यातून दर्शविला जातो.
उदा: म्हणून, सबब, यास्तव, कारण, कि इ.
१) चांगले गुण मिळावेत; म्हणून ती खूप अभ्यास करते.
२) त्याला मुंबईला जायचे आहे; सबब तो शाळेला येणार नाही.
३) चांगले उपचार मिळावेत; यास्तव तो तालुक्यात जात आहे.
संकेतबोधक
गौण वाक्यात अट संकेत दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याच्या परिणाम दिलेला असतो.
उदा : जर-तर, म्हणजे, कि, तर इ.
१) जर अभ्यास केला, तर पास व्हाल.
२) पास झालो, कि पेढे वाटीन.
३) तू इशारा केलास, कि मी येईन.
कारणबोधक
या प्रकारात प्रधान वाक्यातील घटनेचे कारण दर्शविणारे गौणवाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययांना करंबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा : कारण, का-कि इ.
१) त्याला शिक्षा झाली ; कारण त्याने चोरी केली.
२) भारत सामना जिंकला; कारण खेळाडूंनी चांगला धाव केल्या.