तत्पुरुष समास

तत्पुरुष समास (द्वितीय पद प्रधान):

या समासातील दुसरे पद महत्वाचे असून, समासाचा विग्रह करताना विभक्ती प्रत्यय लिहावा

तत्पुरुष समासाचे खालील प्रकार पडतात.

 

विभक्ती तत्पुरुष

ज्या तत्पुरुष समासात कोणत्यातरी  विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात.

१) सुखप्राप्त – सुखाला प्राप्त

२) दुःखप्राप्त – दुःखाला प्राप्त

३) तोंडपाठ – तोंडाने पाठ

४) भक्तिवश – भक्तीने वश

५) बुद्धिजड -बुद्धीने जड

६) गुणहीन – गुणाने हीन

७) क्रीडांगण – क्रीडेसाठी अंगण

८) सचिवालय – सचिवासाठी आलय

९) गायरान –  गाईसाठी रान

१०) तपाचरण – तपासाठी आचरण

११) सेवानिवृत्त – सेवेतून निवृत्त

१२) जन्मखोड – जन्मापासून खोड               

 

अलुक तत्पुरुष

तत्पुरुष समास तयार करताना पूर्व पदाचा विभक्ती प्रत्यय लोप करावा लागतो; परंतु ज्या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या ‘ई’ विभक्तिप्रत्ययाचा लोप होत नाही, त्यास अलुक तत्पुरुष (अलुक-लोप न पावणारे) असे म्हणतात.

१) पंकेरुह (ए = अ + ई)

२) कर्मणीप्रयोग (ई)

३) कर्तरीप्रयोग (ई)

४) अग्रेसर (ए = अ + ई)

 

उपपद तत्पुरुष/ कृदंत तत्पुरुष

ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असते व ते धातुसाधित/कृदंत असते व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही, त्यास उपपद/कृदंत तत्पुरुष समास म्हणतात.

१) नीरज – नीरात जन्मणारा

२) पंकज- पंकात (चिखलात) जन्मणारे

३) कुंभकार -कुंभ करणारा

४) जलद – जल देणारे

५) ग्रंथकार – ग्रंथ करणारा सुखद सुख देणारे

६) लाचखाऊ- लाच खाणारा

७) खग – आकाशात गमन करणारा मार्गस्थ

 

नत्र तत्पुरुष समास

ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे अ, अन्, न, ना, बे, नि, गैर यांसारख्या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरू होते त्यास नत्र तत्पुरुष समास म्हणतात.

१) नापसंत – पसंत नसलेला

२) अशक्य – शक्य नसलेला

३) बेकायदा – कायदेशीर नसलेले

४) अन्याय – न्याय नसलेला

५) अहिंसा – हिंसा नसलेला

६) अनादर – आदर नसलेला

७) नाइला – इलाज नसलेला

८) निर्दोष – दोष नसलेला

 

कर्मधारय समास

ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो त्यास कर्मधारय समास म्हणतात.

१) नीलकमल – नीळे असे कमल

२) महादेव – महान असा देव

३) घनश्याम – घनासारखा श्याम

४) रक्तचंदन – रक्तासारखे चंदन

५) मुखकमल – मुख हेच कमल

६) पितांबर – पिवळे असे वस्त्र

७) श्यामसुंदर – सुंदर असा श्याम

८) विद्याधन – विद्या हेच धन

९) भवसागर – विश्वरूपी सागर

१०) महाराष्ट्र – महान असे राष्ट्र

 

द्विगू समास

ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो, त्यास द्विगू समास म्हणतात.

१) बारभाई – बारा भावांचा समुदाय

२) चौघडी – चार घड्यांचा समुदाय

३) त्रैलोक्य – तीन लोकांचा समुदाय

४) पंचपाळे – पाच पाळ्यांचा समुदाय

५) त्रिभुवन – तीन भुवनांचा समुदाय

६) सप्ताह – सात दिवसांचा समूह

७) पंचवटी – पाच वडांचा समूह चातुर्मास चार महिन्यांचा समुदाय

८) नवरात्र – नऊ रात्रींचा समूह

 

मध्यमपद लोपी समास

ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो त्यास मध्यमपदलोभी समास म्हणतात

१) साखरभात – साखर घालून केलेला भात

२) पुरणपोळी – पुरण घालून केलेली पोळी

३) घोडेस्वार – घोडा असलेला स्वार

४) गुरुबंधू – गुरूचा शिष्य या नात्याने बंधू

५) गुळांबा – गुळ घालून केलेला आंबा

 

1 thought on “तत्पुरुष समास”

Comments are closed.