शब्दयोगी अव्यय
वाक्यातील नाम सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात.
टीप : शब्दयोगी अव्यय नेहमी नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात परंतु काही शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येत नाही.
शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
कालवाचक
कालवाचक शब्दयोगी अव्यय चे प्रकार
कालदर्शक
उदा : पावेतो, पूर्वी, नंतर, पुढे, आधी इ.
१) महिन्यापूर्वी तो बिमार होता.
२) दुपारनंतर जेवायची सुट्टी होते.
३) जेवणाआधी औषध घ्या.
गती वाचक
उदा : खालून, आतून, पासून, पर्यंत, मधून इ.
१) आरती वर्षातून एकदाच येते.
२) मी रात्री बारापर्यंत येईल.
३) जुनपासून पावसाळा सुरु होते.
स्थलवाचक
उदा : आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, समीप, नजीक, सक्षम, मध्ये, पुढे, समोर इ.
१) पैसे कपाटात ठेवले आहे.
२) शाळेसमोर मैदान आहे.
३) घराजवळ बँक आहे.
करणवाचक (साधन)
उदा : मुले, कारवी, योगे, हाती, द्वारा, कडून इ.
१) त्याने दुसऱ्याहाती निमंत्रण पाठविले.
२) पोलिसांकडून चोर पकडला गेला.
३) वाऱ्यामुळे कपडे लवकर वळतात.
हेतू वाचक
उदा : करिता, साठी, करणे, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्य, सत्व इ.
१) जगण्या करीता अन्न हवे.
२) लेख लिहण्यासाठी मला पेन हवा.
३) उपचारानिमित्य तो बोरगावला गेला.
व्यतिरेक वाचक
उदा : विना, शिवाय, खेरीज, परता, वाचून, व्यतिरिक्त इ.
१) पाण्याविना जीवन नाही.
२) तुझ्याशिवाय पार्टीची मजा येणार नाही.
३) पंकजशिवाय करमत नाही.
तुलनावाचक
उदा : पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस इ.
१) माणसापरीस मेंढर बरी.
२) शामपेक्षा पंकज उंच आहे.
३) मुलांमध्ये शाम सर्वात हुशार आहे.
योग्यतावाचक
उदा : सम, समान, सारखा, जोगा, योग्य, प्रमाणे, बरहुकूम इ.
१) हा शर्ट माझ्या मनाजोगा आहे.
२) हा फळ खाण्यायोग्य आहे.
कैवल्य वाचक
उदा : च, ना, मात्रा, फक्त, केवळ इ.
१) मारुतीचं समुद्र उलंघू जाऊ शकते.
२) फक्त देव तुला या संकटातून वाचवू शकते.
टीप : फक्त, केवळ, मात्र हि शब्दयोगी अव्यय असून सुद्धा नामाला जोडून येत नाही.
संग्रहवाचक
उदा : सुद्धा, देखील, हि, पण, बारीक इ.
१) मी सुद्धा तिला मदत करेल.
२) देव देखील भक्तासाठी धावून येते.
संबंध वाचक
उदा : विषयी, विशी, संबंधी इ.
१) भारताविषयी माझ्या मनात अपार प्रेम आहे.
साहचर्य वाचक
उदा : संगे, सह, बरोबर, सकट, सहित, निशी, सवे, समवेत इ.
१) पुष्पांसंगे मातीस सुवास लागे.
२) सालीसकट फळ खाणे हितकारक असते.
भगवाचक
उदा : पैकी, पोटी, आतून इ.
१) संभरातून एखादाच वाईट निघतो.
२) पंधरापैकी सात पक्षी उडून गेले.
विनिमय वाचक (एका वस्तू बद्दल दुसरी वस्तू)
उदा : बद्दल, ऐवजी, जागी, बदली इ.
१) साखर ऐवजी गूळ द्या.
२) शाम ऐवजी पंकजला खेळवणे धोकादायक आहे.
दिकवाचक (समोरची दिशा)
उदा : प्रत, प्रति, कडे, लागी, इ.
१) तुझ्याकडे ५०० रुपये आहेत का.
२) सर्वांप्रती आदर असावा.
विरोध वाचक
उदा : विरुद्ध, वीण, उलटे, उलट इ.
१) भारताविरुद्ध पाकिस्तान हरला.
२) पोलिसाने चोर पकडला, त्याउलट त्याने पोलीसवर आरोप केला.
परिमाण वाचक
उदा : भर
१) दिवसभर पाऊस कोसळत होता.
२) गावभर पुरून हरण्या गोठ्यात येऊन थांबला.