शब्द शक्ती
शब्दाच्या अंगी जे वेग वेगळे अर्थच्छटा करण्याची जी शक्ती असते त्यास शब्द शक्ती म्हणतात.
शब्द शक्तीचे ३ प्रकार आहेत:
अमिधा
व्यंजना
लक्षणा
अमिधा
शब्द उच्चारल्या बरोबर सरळ एकच अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीस अमिधा (वाच्यार्थ) म्हणतात .
उदा –
१) मी एक कुत्रा पहिला. (एक प्राणी)
२) राम जेवायला बसला.
३) मी एक पुस्तक खरेदी केले.
४) घरात फार पाल झाल्या आहेत.
व्यंजना
मूळ अर्थ सोडून दुसरा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीस व्यंजना (व्यंगार्थ) म्हणतात . काव्य रचना अधीक प्रभावी बनविण्या साठी या शब्द शक्तीचा वापर केला जातो .
उदा –
१) समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे. (वाईट माणसे)
२) भुंकणारे कुत्रे चावत नसतात. (पोकळ धमकी देणारे)
३) निवडणूक आल्या कि कावड्यांची काव काव सुरु होते. (राजनीती करणारे)
४) घड्याळाने सात ठोके दिले. (सात वाजल्याचे दर्शवले)
लक्षणा
जेव्हा मनात शंका येते कि हे शक्य कसे त्या शब्द शक्तीस लक्षणा (लक्ष्यार्थ) म्हणतात, मूळ अर्थ लक्षात न घेता दुसरा अर्थ लक्षात घयावा लागतो.
उदा –
१) बाबा ताटावर बसले. (जेवायला)
२) सूर्य बुडाला.
३) घरावरून हत्ती गेला. (समोरून)
४) मी शेक्सपियर वाचला. (पुस्तक)