सर्वनाम
नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळणाऱ्या शब्दाला सर्वनाम (प्रतिनाम) म्हणतात.
सर्वनामाचे ६ प्रकार पडतात
पुरुषवाचक
दर्शक
संबंधी
प्रश्नार्थक
सामान्य / अनिश्चित
आत्मवाचक
मराठीत मूळ ९ सर्वनामे आहेत
(मी, तो, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः)
पुरुषवाचक सर्वनाम
बोलणारा किंवा लिहणारा ज्या सर्वनामांचा वापर करतो त्यास पुरुष वाचक सर्वनाम म्हणतात.
पुरुष वाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात
प्रथम पुरुष वाचक सर्वनाम
बोलणारा किंवा लिहणारा ज्या सर्वनामांचा वापर स्वतः साठी करतो त्यास प्रथम पुरुष वाचक सर्वनाम म्हणतात.
उदा – (मी, आम्ही, आपण, स्वतः)
१) मी उद्या गावाला जाणार आहे.
२) आपण गावाला जाऊ.
३) आम्ही तुला मदत करू.
४) स्वतः खात्री करून घे.
व्दितीय पुरुष वाचक सर्वनाम
बोलणारा किंवा लिहणारा समोरच्या व्यक्ती साठी ज्या सर्वनामांचा वापर करतो त्यास व्दितीय पुरुष वाचक सर्वनाम म्हणतात
उदा – (तू, तुम्ही, स्वतः, आपण इ.)
१) आपण आत यावे. (तुम्ही)
२) तुम्ही एवढे काम कराच.
३) आपण आलात बरे वाटले. (तुम्ही)
४) स्वतः आलात बरे झाले. (तुम्ही)
तृतीय पुरुष वाचक सर्वनाम
बोलणारा किंवा लिहणारा ज्यांच्या बदद्ल बोलायचे आहे (जो हजार नाही) त्यांच्या साठी ज्या सर्वनामांचा वापर करतो त्यास तृतीय पुरुष वाचाक सर्वनाम म्हणतात.
उदा – (तो, ती, ते, त्या)
१) तो म्हणे आजारी होतो.
२) ती अतिशय सुंदर होती.
३) त्या चांगल्या गात.
दर्शक सर्वनाम
जवळची किंवा दूरची वस्तू दर्शविण्या साठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात
उदा – (हा, हि, हे, ह्या, तो, ती, ते, त्या)
१) ती हुशार मुलगी आहे.
२) हा रानटी हत्ती आहे.
३) तो काळा कुत्रा आहे.
४) तो मठ्ठ मुलगा आहे.
संबंधी सर्वनाम
वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात.
उदा – (जे, ते, जर, तर)
१) जे चकाकते ते सोने नसते
२) जो करेल तो भरेल
३) गर्जेल तो करील काय?
४) ज्याने भांडण उकरले त्याने माघार घ्यावी.
प्रश्नार्थक सर्वनाम
प्रश्न विचारण्या करिता ज्या सर्वनामांचा वापर केला जातो ज्यास प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात
उदा – (कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इ.)
१) कोणी रामायण लिहले?
२) कोणी मारला हा उंदीर?
३) काय नाव आहे तुझे?
४) तो गावाला गेला काय?
सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम
ज्या सर्वनामाचा वापर कोणत्या नामाकरिता केले गेले हे निश्चित पणे सांगता येत नाही ज्यास सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतात.
१) कोणी यावे टिकली मारुन जावे
२) कोण हि गर्दी!
३) कोणी, कोणास काय म्हणावे!
४) माझ्या मुठीत काय ते सांग पाहू!
आत्म वाचक सर्वनाम
जेव्हा आपण या शब्दाचा अर्थ स्वतः असा होतो तेव्हा त्यास आत्म वाचक सर्वनाम म्हणतात .
उदा: (आपण, स्वतः, निज)
१) मी स्वतः त्याला पहिले.
२) तो आपणहून माझ्या कडे आला.
३) पक्षी निज बाळासह बगळती.
४) तू स्वतः जाऊन ये.