मराठी भाषेचे उगम
भारतातील भाषा २ गटात विभागल्या आहेत.
१) इंडोयुरोपिअन (इंडो -आर्य)
२) द्रविडीयन
- भारतात मातृभाषाची संख्या १६५२
- संस्कृत व तामिळ भारतातील सर्वात जुन्या भाषा आहेत
- कलम ३४३ नुसार देवनागरी लिपी लिहली जाते
- भारतातील प्रादेशिक भाषांची संख्या २२
उदा: असामी, बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मैथई, मराठी, नेपाली, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संथाली, तामिळ, तेलगु, उर्दु, इत्यादी.
मराठी भाषेचा विकास संस्कृत-प्राकृत भाषेपासून झाला.
भाषा – विचार व्यक्त करण्याची साधन म्हणजे भाषा
भाषा काळानंतर व प्रदेशानुसार बदलते म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात.
भाषेचे २ प्रकार
१) स्वाभाविक/नैसर्गिक (पुरावा नसतो ) बोलणे, हावभाव, पक्षाचे आवाज.
२) कृत्रिम/सांकेतिक (पुरावा असतो ) लिखाण, अक्षरे, चिन्हे.
- भाषा हा शब्ध भाष या धातू पासून बनला आहे ज्याचा अर्थ बोलणे असा होतो.
- लिंपणे या शब्दापासून लिपी हा शब्द बनला आहे.
- आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी म्हणतात.
- मराठी भाषेची लिपी देवनागरी असून डावीकडून उजवी कडे लिहतात.
- अक्षरावर जी आडवी रेष देतात तिला शिरोरेषा म्हणतात.
टीप : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पाठारे समिती नेमण्यात आली.
संस्क्रुत धातू : भाष – भाषा, लिपी – लिंपणे, लीख – लिखाण.
ब्राम्हीलिपी
भारतातील सर्व लिपीची जननी म्हणजे ब्राम्ही लिपी, या लिपीचा शोध ब्रम्हदेवाने लावला म्हणून या लिपीला ब्राम्ही लिपी म्हणतात असे म्हटले जाते.
खारोष्ट्ठी लिपी
खरोष्ठी लिपीला गांधारी लिपी सुद्धा म्हणतात व बौद्ध उल्लेखात याह वापर आढळतो.
देवनागरी लिपी
देवनागरी लिपी आर्यांची लिपी मानली जाते.
मोडी लिपी
देवनागरी लिपी काहि काळ मुरुड घालून लिहत होते म्हणून यास मोडी लिपी म्हणतात, मोडी लिपीला धाव लिपी, बाळबोध लिपी म्हणतात.
मातृभाषा
स्वतःच्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा म्हणतात.
महत्वाचे: मराठीचा पाहिला पुरावा कर्नाटक श्रवणबेळगोड येथे गोमटेश्वराच्या बाहुबली च्या पुतळ्याखाली इ .स. ९८३ मध्ये लिहलेली श्री चामुंडराजे करविले मानला जातो .परंतु सप्तशती हा मराठीतील २ हजार वर्ष पूर्वीचा ग्रंथ सापडला.
आद्य ग्रंथसंपदा | |
मुकुंदराज | विवेकसिंधु |
ज्ञानेश्वर | भावार्थदीपिका / ज्ञानेश्वरी |
केशवदेव व्यास | दृष्टांत पाठ |
भीष्माचार्य | पंचवार्तिका |
मराठी व्याकरण वरील पुस्थके
- विल्यम कॅरी १८०५ – द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज
- दादोबा पांडुरंग तर्खडकर १८३६ – महाराष्ट्र भाषेचा व्याकरण
- गंगाधर शास्त्री फडके १८३६ – महाराष्ट्र भाषेचा व्याकरण (नाव व वर्ष सारख)
- मराठी भाषेचे पाणिनी – दादोबा पांडुरंग तर्खडकर
- मराठी भाषेचे शिवाजी – विष्णुशास्त्री चिपळूणकर
- मराठी भाषेचे जॉन्शन – कृष्णशास्त्री चिपळूणकर