केवलप्रयोगी अव्यय

केवलप्रयोगी अव्यय

मनातील उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

केवलप्रयोगी अव्यय भावना प्रधान असतात.

१) हर्षदर्शक : अहाहा, आ-हा, अहा, वा, वा-वा, ओ-हो इ.

२) शोकदर्शक : शिव-शीव, हरहर, देवा रे, रामा रे, अंगाई, आई गं, हाय, हायहाय, ऊ, अं, अरेरे इ.

३) आच्छर्यदर्शक : ऑ, ओहो, अबब, अहाहा, बाप रे, ओ, अरेच्चा इ.

४) प्रशंसादर्शक : छान, वाहवा, भले, शाब्बास, यव, चॅन, ठीक, फक्कड, खाशी इ.

५) संमतीदर्शक : ठीक, जिहा, जी, हां, बराय, अच्छा इ.

६) विरोधदर्शक : छे छे, अहं, उहू, ऊ, हॅट, छट, छे, च इ. 

७) तिरस्कारदर्शक : धिक, थू, शी, इश्श, हुडत, हूड, फूस, हात, छत, छी इ.

८) संबोधनदर्शक : अगं, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे इ.

९) मौनदर्शक : चूप, चुपचाप, गप, गुपचूप इ.

 

व्यर्थ उद्गारवाची अव्यय

जी उद्गारवाची अव्यय कोणताही भाव व्यक्त करत  नाहीत  तसेच त्यांच्या वापराने वाक्याच्या अर्थावरून कोणताही परिणाम होत नाही अशा शब्दांना व्यर्थ उद्गारवाची अव्यय म्हणतात.

उदा : बापडा, वेडे, म्हणे, आपला इ.

१) शरीर बेटे साथ देत नाही आता!

२) मी बापडा काय बोलणार!

३) त्याची म्हणे चांगलीच फजिती झाली!

४)  ती आपली काय तक्रार करणार!

 

पादपूरनार्थक केवलप्रयोगी अव्यय/पालूपदे

बोलताना लकब म्हणून किंवा उगीचच पुनःपुन्हा आलेल्या शब्दांना पादपूरनार्थक केवलप्रयोगी अव्यय किंवा पालूपदे म्हणतात.

उदा : बरंका, आत्ता, जळलं, मेलं, आणखीन इ.