द्वंद्व समास
ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात, त्यास द्वंद्व समास म्हणतात.
द्वंद्व समासाचे खालील प्रकार पडतात
इतरेतर द्वंद्व समास
या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि, व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. यातील दोन्ही घटक महत्त्वाचे असतात.
१) रामलक्ष्मण – राम आणि लक्ष्मण
२) विटीदांडू – विटी आणि दांडू
३) आईवडील – आई आणि वडील
४) स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष
५) कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन
६) भीमार्जुन – भीम आणि अर्जुन
७) अहिनकुल – अहि आणि नकुल
वैकल्पिक द्वंद्व समास
या सामासिक शब्दांचा विग्रह करताना अथवा, किंवा, वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. शक्यतो विरुद्धार्थी शब्द असतात.
१) न्यायान्याय – न्याय किंवा अन्याय
२) पंधरासोळा – पंधरा किंवा सोळा
३) मागेपुढे – मागे किंवा पुढे
४) बरेवाईट – बरे अथवा वाईट
५) खरेखोटे – खरे किंवा खोटे
६) सत्यासत्य – सत्य किंवा असत्य
समाहार द्वंद्व समास
ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय तशाच प्रकारच्या आणखी घटकांचाही अंतर्भाव केलेला असतो, त्यास समाहार द्वंद्व समास म्हणतात.
१) वेणीफणी – वेणीफणी व इतर साजशृंगार
२) शेतीवाडी – शेती, वाडी व इतर तत्सम जायदाद
३) भाजीपाला – भाजी, पाला व तत्सम वस्तू
४) केरकचरा – केरकचरा व इतर टाकाऊ पदार्थ
1 thought on “द्वंद्व समास”
Comments are closed.