बहुव्रीही समास

बहुव्रीही समास

ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होते त्यास बहुर्व्रीही समास म्हणतात

बहुव्रीही समासाचे खालीलपैकी ४ प्रकार पडतात

विभक्ती बहुव्रीही

नत्र बहुव्रीही समास

सहबहुव्रीही समास

प्रादि बहुव्रीही समास

 

विभक्ती बहुव्रीही

विभक्ती बहुव्रीही समासाचे खालील दोन प्रकार पडतात.

समानाधिकरण

व्याधिकरण

 

समानाधिकरण

विग्रह करताना यातील दोन्ही पदे एकाच विभक्तीतीत असतात.

१) लक्ष्मीकांत – लक्ष्मी आहे कांता ज्याची विष्णू (प्रथमा)

२) वक्रतुंड – वक्र आहे तुंड (तोंड) ज्याचे तो गणपती (प्रथमा)

३) नीलकंठ – नील आहे कंठ ज्याचा तो शंकर (प्रथमा)

४) भक्तप्रिय – भक्त आहे प्रिय ज्याला तो देव (प्रथमा)

५) जितेंद्रिय – जित आहेत इंद्रिये ज्याची तो मारुती (प्रथमा)

 

व्याधिकरण

विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात.

१) सुधाकर – आहे करात असा तो (चंद्र) (प्रथमा-सप्तमी)

२) गजानन – गजाचे आहे आनन ज्याला तो (गणेश) (षष्ठी-प्रथमा)

३) भालचंद्र – भाळी आहे चंद्र ज्याच्या तो (शंकर) (सप्तमी-प्रथमा)

४) चक्रपाणि – चक्र आहे पाणित असा तो (विष्णू) (प्रथमा-सप्तमी)

काही व्याकरणकर्ते पितांबर हा शब्द बहुव्रीही समास मानतात. कारण त्यातून विष्णू या तिसऱ्या घटकाचा बोध होतो.

 

नत्र बहुव्रीही समास

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नि असे नकारदर्शक असेल तर त्यास नत्र बहुव्रीही सम्मास म्हणतात.

१) अव्यय – नाही व्यय ज्याला ते

२) अनंत – नाही अंत ज्याला तो

३) निर्धन – गेले आहे धन ज्याच्यापासून असा तो

४) नीरस – नाही रस ज्यात ते

५) नाक – नाही अक (दु: ख) ज्यात तो

६) अनादी – नाही आदी ज्याला तो

७) अखंड – नाही खंड ज्याला असे

 

सहबहुव्रीही समास

ज्या बहुव्रीही समासाचे. पहिले पद ‘सह’ किंवा ‘स’ अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो

१) सादर – आदराने सहित असा तो

२) सफल – फलाने सहित असे ते

३) सवर्ण – वर्णासहित असा तो

४) सहपरिवार – परिवारासहित असा तो

५) सबल – बलाने सहित असा तो

 

प्रादि बहुव्रीही समास

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, सु, दुर, वि अशा उपसर्गांनी युक्त असते त्यास प्रादिबहुव्रीही समास म्हणतात.

१) सुमंगल – पवित्र आहे असे ते

२) दुर्गुणी – गुणांपासून दूर असलेला

३) प्रबळ – अधिक बलवान असा तो

४) विख्यात – विशेष ख्याती असलेला तो

५) निघृण – निघून गेली आहे घृणा ज्यातून तो

1 thought on “बहुव्रीही समास”

Comments are closed.