अव्ययीभाव समास

अव्ययीभाव समास (प्रथमपद प्रधान):

या समासातील पहिले पद अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो हे शब्द स्थळ/काळ/रीतिवाचक असतात.

 

(आ, यथा, प्रति हे संस्कृत  उपसर्ग लागून तयार झालेले शब्द)

१) आजन्म – जन्मापासून (कालवाचक)

२) आमरण – मरेपर्यंत (कालवाचक)

३) यथाक्रम – क्रमाप्रमाणे (रीतिवाचक)

४) प्रतिक्षण – प्रत्येक क्षणाला (कालवाचक)

५) यथान्याय – न्यायाप्रमाणे (रीतिवाचक)

 

(बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यांसारखे फारशी उपसर्ग लागून तयार झालेले शब्द)

१) दरसाल – प्रत्येक वर्षी (कालवाचक)

२) हररोज- प्रत्येक दिवशी (कालवाचक)

३) बिनधास्त – धास्तीशिवाय (रीतिवाचक)

४) बेशक – शंका न घेता/शंकेशिवाय (रीतिवाचक)

५) बेलाशक – शंका न घेता/शंकेशिवाय (रीतिवाचक)

६) गैरहजर –  हजेरीशिवाय (रीतिवाचक)

७) बिनधोक- धोक्याशिवाय (रीतिवाचक)

८) बिनचूक – चुकीशिवाय (रीतिवाचक)

९) बरहुकूम- हुकुमाप्रमाणे (रीतिवाचक)

१०) बिनशर्त शर्तीशिवाय (रीतिवाचक)

 

(मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात)

१) वारंवार – प्रत्येक वारी (कालवाचक)

२) पानोपानी – प्रत्येक पानात (स्थलवाचक)

३) गल्लोगल्ली- प्रत्येक गल्लीत (स्थलवाचक)

४) दिवसेंदिवस- प्रत्येक दिवशी (कालवाचक)

५) दारोदार- प्रत्येक दारी (स्थलवाचक)

६) जागोजागी – प्रत्येक जागी (स्थलवाचक)

 

1 thought on “अव्ययीभाव समास”

Comments are closed.